महेंद्रशेठ घरत हे मनोहर भोईर यांना निवडून आणण्यासाठी मैदानात
उरण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी अधिकृतपणे दिलेल्या पाठींब्यामुळे प्रचाराला विशेष गती मिळाली आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या संपूर्ण ताकदीने मनोहर भोईर यांच्या पाठीशी उभे राहिल्याने, उरणमध्ये "डबल इंजिन" चा प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे.
मनोहर भोईर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी स्वतः कंबर कसली असून, काँग्रेस पक्षाची सर्वतोपरी ताकद भोईर यांच्या पाठीशी उभी केली आहे. आज जासई येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत हे मनोहर भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसले.
महेंद्रशेठ घरत यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केले की, "महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुती सरकार उलथून लावून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हा आमचा उद्देश आहे." या प्रचारावेळी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मैदानात उतरले होते.
महेंद्रशेठ घरत यांच्या पाठींब्यामुळे, डबल इंजिनची ताकद मिळालेल्या मनोहर भोईर यांना निवडून येण्याची खात्री असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: