मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी येथे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत एका कॅश व्हॅनमधून साडेसहा टन (6500 किलो) चांदीच्या विटा सापडल्या आहेत.
सध्याच्या बाजारभावानुसार या चांदीची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासणीत या चांदीच्या विटा अधिकृत असल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
निवडणुकीच्या काळात सातत्याने अशा प्रकारे रोकड व किंमती वस्तू सापडत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त अधिक कडक केला आहे.
कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०६:०७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०६:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: