कासारवाडी - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या कासारवाडी परिसरातील प्रचार फेरीत सर्वधर्मीय समाजाने जल्लोषात सहभाग नोंदवला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीवर्धन यांच्यासह अनेक मान्यवरांनी या प्रचार फेरीत सहभाग घेतला.
शनी मंदिरापासून सुरू झालेल्या प्रचार फेरीत माजी नगरसेवक सोपानराव लोंढे आणि चंद्रकांत लांडगे यांच्या निवासस्थानी डॉ. शिलवंत यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. एस.डी.ए. प्रेयर हॉल येथे ख्रिश्चन समाजाच्या वतीने पास्टर अभय मोरे व जोसेफ खाजेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघाच्या वतीने जैन बांधवांनी केलेल्या स्वागत सोहळ्यात नामवंत चार्टर्ड अकाउंटंट अशोककुमार पगारिया आणि सामाजिक कार्यकर्ते आकाश लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या. जामा मशिदीत मौलवींनी आशीर्वाद दिले.
या प्रचार फेरीत पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, लहू लांडगे, दिनेश लांडे, गजानन धावडे, मेहबूब इनामदार यांच्यासह काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. लोणावळ्याचे नगरसेवक विश्वेश्वर आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनीही सहभाग नोंदवला.
प्रचार फेरीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अनेक लहान मुलांनी गुलाबपुष्पे देऊन डॉ. शिलवंत यांचे स्वागत केले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पिंपरी विधानसभेतून डॉ. शिलवंत यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०६:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: