"गव्हाणे करतील संधीचे सोने" - माजी महापौर हनुमंत भोसले यांचा विश्वास
भोसरी (वृत्तसंस्था) - पिंपरी-चिंचवड शहरातील सिरवी समाजाने महाविकास आघाडी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजाच्या प्रश्नांसाठी विशेष पुढाकार घेण्याचे आश्वासन गव्हाणे यांनी यावेळी दिले.
नेहरूनगर येथील माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिरवी समाजाचे अध्यक्ष वाघाराम केशवजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"नेहरूनगर भागात सिरवी समाज गुण्यागोविंदाने राहत असून, व्यवसायाच्या निमित्ताने शहरभर विखुरलेल्या या समाजाने शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे," असे गव्हाणे यांनी सांगितले. समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचेही त्यांनी आश्वासित केले.
माजी महापौर हनुमंत भोसले यांनी कै. दामोदर गव्हाणे यांच्या नीतिमत्तेचा वारसा अजित गव्हाणे पुढे नेत असल्याचे सांगितले. "गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले अजित गव्हाणे संधीचे सोने करतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले, विरोधी पक्ष नेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, सिरवी समाजाचे अध्यक्ष वाघाराम केशवजी चौधरी, उपाध्यक्ष बाबुलाव पन्नाजी चौधरी, सचिव गणेशराम लाधाजी चौधरी, रमेश रामजी चौधरी, युवा सचिव मोहनलाल धोघारामजी चौधरी, महिलाध्यक्ष संतोष भेराराम चौधरी आदी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०५:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: