"उरणची मानाची साई पालखी शिर्डीच्या वाटेवर"
उरण - श्री साई सेवा मंडळ उरण विभागातर्फे आयोजित 24व्या वार्षिक उरण ते शिर्डी पालखी दिंडी सोहळा येत्या 5 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.
श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त देऊळवाडी-उरण येथील श्री दत्तमंदिरातून सकाळी 6.30 वाजता आरतीनंतर पालखी प्रस्थान करेल. 13 डिसेंबरला सकाळी 10 वाजता पालखी शिर्डी येथे पोहोचेल. प्रस्थानापूर्वी सकाळी 6 ते 6.30 या वेळेत साईभक्तांना पालखी व पादुकांचे दर्शन घेता येईल.
दैनंदिन कार्यक्रमात पहाटे 5 वाजता आरती, पूजन व भजन, मध्यान्ह आरती, साई सच्चरित्र पारायण, साईस्तवन यांचा समावेश असेल. दिंडीची सांगता 21 डिसेंबरला जसखार येथील श्री रत्नेश्वरी मंदिरात श्री साई भंडारा व श्री सत्यनारायण महापूजेने होणार आहे.
पदयात्रेत सहभागी होण्यासाठी बोकडविरा बस स्टॉपजवळील किरीट पाटील यांच्या कार्यालयात नोंदणी सुरू आहे. अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील (9920548181) किंवा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील (8879614920) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०४:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: