पिंपरी :"पिंपरी विधानसभेत सुशिक्षित आणि योग्य नेतृत्व निवडण्याची वेळ आली असून, बोपखेलवासीय सुलक्षणा शिलवंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहेत," असे शिवसेना (उबाठा) च्या जिल्हा युवती प्रमुख प्रतीक्षा घुले यांनी सांगितले.
शिलवंत यांच्या बोपखेल परिसरातील प्रचारफेरीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या विजयानंतर मिरवणूक आणि विकासकामांचा शुभारंभ बोपखेलमधूनच होईल, असा विश्वास घुले यांनी व्यक्त केला.
भाग्यदेव घुले म्हणाले, "सध्याच्या आमदारांनी बोपखेल, रामनगर, गणेश नगर भागात एक रुपयाही निधी आणला नाही. डॉक्टरेट प्राप्त सुशिक्षित महिला उमेदवाराला विजयी करण्याची संधी मिळाली आहे."
हरिओम जेष्ठ नागरिक संघासह अनेक नागरिकांनी डॉ. शिलवंत यांना पाठिंबा दर्शवला. प्रचारफेरीदरम्यान घरोघरी त्यांचे स्वागत करण्यात आले.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०६:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: