पिंपरीत विकासकामांची नवी आश्वासने
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारून सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले.
फुगेवाडी येथील प्रचार पदयात्रेत ते बोलत होते. "अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्यात येतील," असे ते म्हणाले.
पाच रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण, दापोडी येथील त्रैलोक्य बौद्ध विहाराला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अद्ययावत भवन उभारण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
माजी नगरसेविका उषा वाखारे, संध्या गायकवाड, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत महिलांनी औक्षण केले.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०६:००:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: