महिला कल्याण योजनांमुळे रासने यांना मिळणार पाठिंबा
पुणे : महिलांचे संरक्षण, संवर्धन आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या हेमंत रासने यांच्या पाठीशी कसबा मतदारसंघातील महिला भक्कमपणे उभ्या असल्याचा विश्वास भाजपच्या शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी व्यक्त केला.
बापट म्हणाल्या, "रासने यांच्या पुढाकारातून बारा हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. लेक लाडकी योजना, एसटी प्रवासात ५०% सवलत, मोफत उच्च शिक्षण अशा योजनांचा लाभ मिळवून देण्यात ते आघाडीवर आहेत."
तेरा हजारहून अधिक महिलांनी आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार अशा सुविधांचा लाभ घेतला आहे. दरवर्षी वीस हजार महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मृणालिनी रासने, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांच्यासह अनेक जणी घरोघर जाऊन प्रचार करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:११:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: