माजी आमदार थोरवेंच्या वक्तव्यावरून उरणमध्ये खदखद
उरण (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याविषयी माजी आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजितदादा पवार गट) जाहीर निषेध केला.
नागाव रोड येथील तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या कार्यालयात आयोजित निषेध सभेत बोलताना ठाकूर म्हणाले, "महायुतीचा धर्म सर्वांनी पाळावा, कोणीही चुकीची किंवा आक्षेपार्ह विधाने करू नयेत. तटकरे साहेबांविषयी यापुढे कोणीही आक्षेपार्ह टीका करू नये, याची दक्षता घ्यावी."
विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांनीही आक्षेपार्ह वक्तव्यांवर टीका करत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
या निषेध सभेला रायगड जिल्हा उपाध्यक्ष विद्यानंद घरत, वाहतूक सेल रायगड उपाध्यक्ष नरेश घरत, उरण तालुका चिटणीस दिनेश पाटील, तालुका उपाध्यक्ष रतन म्हात्रे यांच्यासह युवा कार्यकर्ते अक्षय घरत, गोपाळ म्हात्रे, राकेश पाटील, रमाकांत पाटील, ज्ञानदेव म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०६:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: