पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही महायुती उमेदवारांना ब्राह्मण समाजाचे समर्थन
चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर सकल ब्राह्मण समाजाने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला असून, हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी समाजाने महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
समाजाचे समन्वयक परीक्षित कुलकर्णी यांनी सांगितले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ब्राह्मण समाजाने नेहमीच भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना - शंकर जगताप, अण्णा बनसोडे आणि महेश लांडगे यांना समाज पाठिंबा देत आहे.
या प्रसंगी भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, सुनीता तापकीर, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सरकारने ब्राह्मण समाजासाठी सुरू केलेल्या अमृत महामंडळ आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळासारख्या योजनांचा उल्लेख करत, भविष्यातही समाजाच्या उन्नतीसाठी सरकार कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०६:०१:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: