"मूलभूत समस्यांवर कलाटेंचे लक्ष; नागरिकांशी संवाद"
चिंचवड (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवड विधानसभा उमेदवार राहुल कलाटे यांनी विविध सोसायटींना भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. टँकरमुक्त आणि समस्यामुक्त चिंचवड करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चिंचवड, रावेत, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, चिंचवडगाव आणि पिंपळे गुरव परिसरातील सोसायटींना भेटी देताना कलाटे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वैयक्तिक गाठीभेटींवर त्यांनी भर दिला.
दिवसभराच्या दौऱ्यात इन्फिनिटी वर्ल्ड, रस्टन कॉलनी, एबीसी यासह अनेक सोसायटींमध्ये बैठका घेण्यात आल्या. नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते या मूलभूत समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली.
कलाटे यांनी ब्लूलाईन क्षेत्रातील घरांचा विकास, अनधिकृत घरांचे नियमितीकरण आणि प्राधिकरण क्षेत्रातील घरांची मालकी हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी कलाटे यांच्या पर्यावरणविषयक कामाचा उल्लेख करत, चिंचवड-हिंजवडी दरम्यान पाच प्रस्तावित रस्ते आणि पवना नदी प्रदूषण रोखण्यासाठी त्यांचे प्रयत्न अधोरेखित केले.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ११:५१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: