"पुण्याच्या विकासासाठी केंद्राचे 54 हजार कोटी; फडणवीसांची माहिती"
पुणे (प्रतिनिधी): कसबा मतदारसंघातील विरोधी पक्षाच्या 'अपघाती आमदारा'ने काम कमी आणि दंगे जास्त केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महायुती उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
फडणवीस यांनी पुण्याच्या विकासाचा आढावा घेताना भूमिगत मेट्रो, 1500 इलेक्ट्रिक बस, एआय-आधारित वाहतूक व्यवस्था, रिंग रोड यांसह विविध प्रकल्पांची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डबल डेकर रस्त्यांसाठी 54 हजार कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, "काँग्रेसने उलेमांचे लांगूलचालन सुरू केले आहे. व्होट जिहादला आपल्याला मताच्या जिहादने उत्तर द्यायचे आहे."
महिला सबलीकरणासाठी शासनाने राबवलेल्या विविध योजनांचाही त्यांनी आढावा घेतला. 11 लाख लखपती दीदी, लेक लाडकी योजना, महिलांसाठी अर्धे एसटी तिकीट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांचा उल्लेख केला.
हेमंत रासने यांनी 18 महिन्यांत 50 हजार नागरिकांच्या समस्या सोडवल्याचे सांगितले. कसबा मतदारसंघाला ट्रॅफिक मुक्त, वाहतूक कोंडी मुक्त आणि स्वच्छ करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ १२:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: