वाकड : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या काळेवाडी-थेरगाव परिसरातील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी चिंचवडमध्ये बदल हवा अशी भावना व्यक्त केली.
काळेवाडीतील ज्योतिबा मंदिरात नारळ फोडून पदयात्रेला सुरुवात झाली. "एकच वादा राहुल दादा" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
श्यामराव काळे, संजोग वाघेरे, हरिष नखाते यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कलाटे यांनी चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथील मंडप मालक वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
"पाणी, रस्ते आणि इतर प्रश्नांतून चिंचवडकरांची कायमची मुक्तता करण्याची ग्वाही मी जनतेला दिली आहे," असे कलाटे म्हणाले.
कलाटेंच्या पदयात्रेला थेरगाव परिसरात जनसमर्थन
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:४८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: