बावनकुळेंना वयोवृद्ध नत्थूजी बांडेबुचेंचा आशीर्वाद
कामठी : "चंद्रशेखर बावनकुळे मागील २० वर्षांहून अधिक काळ कामठीची सेवा करत असून, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या लढवय्ये नेत्याच्या पाठीशी ताकदीने उभे राहा," असे आवाहन ८० वर्षीय समाजसेवक नत्थूजी बांडेबुचे यांनी केले.
कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजप महायुतीचे उमेदवार बावनकुळे यांनी गुरुवारी कामठी शहराचा दौरा केला. तरुण कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत केले.
"ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेरणेतून अधिक मेहनत घेऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणार," असे बावनकुळे म्हणाले.
गांधी चौकात त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार राजू पारवे, मनीष बाजपेयी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: