विकास की विनाश यातून निवड करा - शिंदेंचे आवाहन
कर्जत : "विधानसभा निवडणूक ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठीचे युद्ध आहे. महाराष्ट्राचा मान, सन्मान आणि अभिमान राखण्यासाठी महाविनाश आघाडीला धडा शिकवा," असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, "एकीकडे राज्याची तिजोरी रिकामी करणारी महाविनाश आघाडी तर दुसरीकडे सर्वांसाठी तिजोरी खुली करणारी महायुती आहे."
महायुती सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम १,५०० वरून २,१०० रुपये तर किसान सन्मान निधी १२,००० वरून १५,००० रुपये होईल, असेही त्यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: