पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच विंटेज वाहन प्रदर्शन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी शहरात पहिल्यांदाच भव्य विंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरूनगर, पिंपरी येथील एच.ए. मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनात दुर्मिळ व ऐतिहासिक वाहने प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील मतदान प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथून विंटेज वाहनांची रॅली निघणार आहे. नाशिक रोड मार्गे जे.आर.डी. टाटा उड्डाणपूल, जुना मुंबई-पुणे हायवे होत वल्लभनगर मार्गे एच.ए. मैदानावर रॅली संपन्न होईल.
प्रदर्शनात फियाट बलीला (१९३५), फियाट मिलीसिंटो (१९५५), फियाट सिलेक्ट (१९६०), फियाट सुपर सिलेक्ट (१९६२), फियाट प्रेसिडेंट (१९७५), फियाट प्रीमियर पद्मिनी (१९८०), ११८ एनई यांसारखी दुर्मिळ वाहने प्रदर्शित केली जाणार आहेत.
नागरिकांनी या अनोख्या प्रदर्शनाला भेट देऊन ऐतिहासिक वाहने पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: