'तरुण तगडा भारत अभियान'ची मुंबईत घोषणा
मुंबई : "देशाची सत्ता युवा वर्गाच्या हाती आल्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही," असे मत इको फ्रेन्डली लाईफचे संस्थापक अध्यक्ष अशोक एन.जे. यांनी आज मुंबई प्रेस क्लब येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'तरुण तगडा भारत अभियान'ची घोषणा करताना ते बोलत होते. "सध्याचे राजकारण हे केवळ एकमेकांना लुटण्यासाठी आणि सत्ता बळकावण्यासाठी सुरू आहे. गोरगरीब जनतेविरुद्धची ही लढाई आता थांबली पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेने ५ जून २०२४ पासून पुढील चार वर्षांत देशभरात ७०० कोटी फळझाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
"वॉटर हार्वेस्टिंग, इको व्हिलेज आणि इको हाऊस यासारख्या प्रकल्पांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी युवकांना मिळत आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे या उपक्रमांना अपेक्षित गती मिळत नाही," असे अशोक एन.जे. यांनी सांगितले.
जनजागृतीसाठी ठाणे येथून एक विशेष रथयात्रा सुरू करण्यात आली असून, पथनाट्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण केले जात आहे. "३०-४० वर्षांपूर्वीच्या विचारसरणीने राज्य करणाऱ्या नेत्यांना आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. आधुनिक युगातील सक्षम युवा वर्गाला संधी मिळणे आवश्यक आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
या अभियानाला सर्वसामान्य जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विशेषतः युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: