परिवर्तनासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन
पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी पिंपरी येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रचार दौऱ्यादरम्यान जय हिंद शाळेच्या परिसरात मॉर्निंग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी शैक्षणिक विषमता, बेरोजगारी, गृहनिर्माण समस्या, गुन्हेगारी, पर्यावरण प्रदूषण आणि पायाभूत सुविधांच्या समस्या मांडल्या.
"अनुभवसंपन्न ज्येष्ठ पिढीशी संवाद साधताना अनेक नवीन गोष्टी समजल्या," असे डॉ. शिलवंत यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी त्यांना परिवर्तनासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. शिलवंत यांनी निवडून आल्यास जनहिताचे काम करण्याचे आश्वासन दिले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: