दहा वर्षांत एकही प्रश्न सुटला नाही; गव्हाणेंचा भाजपवर हल्लाबोल
भोसरी (प्रतिनिधी): भाजपचे १८ वर्षांचे जुने कार्यकर्ते बाळासाहेब गव्हाणे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मतदारसंघात नाराजीचे गळू ठसठसत असून ते कधी फुटेल हे सांगता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या दहा वर्षांत रेड झोन, पाणी यांसारखा एकही प्रश्न न सोडवता केवळ जाहिरातबाजी केल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला. "पालिका टू पार्लमेंट" असे सांगून सत्ता मिळवली, मात्र भोसरीला बकाल करण्याचेच काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
२०१४ मध्ये लांडगे यांच्या निवडणुकीसाठी मनापासून काम केल्याचे सांगताना, दिलेली आश्वासने न पाळल्याने नाराजी असल्याचे गव्हाणे यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांना स्वतःच्या प्रभागातील कामांची माहिती नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
भोसरी मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे सांगत, विरोधकांवर टीका करणाऱ्या आमदार लांडगे यांनीही विरोधकांवर टीका करूनच सत्ता मिळवल्याची आठवण गव्हाणे यांनी करून दिली.
भाजपला सोडचिठ्ठी देत बाळासाहेब गव्हाणेंचा गंभीर आरोप
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२४ ०८:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: