अल्पसंख्यांक समाजाने बनसोडेंना पाठिंबा द्यावा - आ. इद्रिस नायकवडी

 

बनसोडेंनी सर्व समाजाला सोबत घेऊन केले काम - योगेश बहल

पिंपरी  (प्रतिनिधी): महायुती सरकारमध्ये अल्पसंख्यांक समाजासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांना बळकटी देण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे यांना निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश अध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी यांनी केले.

अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी बनसोडे यांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांसोबत काम केल्याचे आणि कोरोना काळात वैद्यकीय व शैक्षणिक मदत केल्याचे सांगितले.

कार्यक्रमास भाजपाचे शहर सरचिटणीस राजू दुर्गे, माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शमीम पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

अल्पसंख्यांक समाजाने बनसोडेंना पाठिंबा द्यावा - आ. इद्रिस नायकवडी अल्पसंख्यांक समाजाने बनसोडेंना पाठिंबा द्यावा - आ. इद्रिस नायकवडी Reviewed by ANN news network on ११/११/२०२४ ०८:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".