जैन धर्मियांच्या चातुर्मास यज्ञात मराठा महासंघाची आहुती...!

 

गणेश मिंड 

इंदापूर (प्रतिनिधी) शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी, जैन श्रावक संघ भिगवण यांच्या चातुर्मास यज्ञामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण शाखेच्या वतीने ५२ सभासदांनी सामूहिक निरंकार उपवास व्रत धारण केले. साध्वीरत्न परमपूज्य विचक्षणाजी महाराज आणि संकल्प दर्शनाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आयोजित या उपवासाने मराठा महासंघाच्या सभासदांनी जैन धर्मियांच्या चातुर्मासात सहभाग घेतला, धर्म सहिष्णुतेचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला.

महासंघाच्या वतीने यापूर्वीच्या चातुर्मासातही सभासदांनी निरंकार उपवास केले होते, मात्र यंदा या संकल्पाची अंमलबजावणी अधिक व्यापक होती. सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान उपवास व्रताचा संकल्प साध्वीरत्न महाराजांच्या मार्गदर्शनाखाली घेतला गेला. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर, प्रमुख मार्गदर्शक डॉ. जयप्रकाश खरड, आणि तालुका महिला अध्यक्ष डॉ. पद्माताई खरड यांनी आपले विचार व्यक्त केले.

या उपवासात सहभागी झालेले सभासद: 

श्री. राजकुमार मस्कर, ॲड. श्री. पांडूरंग जगताप, छगनराव वाळके, डॉ. संकेत मोरे, जयश्री मोरे, अशोकराव साळुंके, महिला अध्यक्ष सुचेता साळुंके, सुभाषराव फलफले, दिनेश मारणे, लता मारणे, संतोष दाताळ, अभिनव वाघ, तुकाराम काटकर, धनाजी नलवडे, भरत मोरे, संगीता मोरे, भरत ननवरे, सचिन जाधव, सुहास गलांडे, माधवराव नाईक-निंबाळकर, अनिल गलांडे, उर्मिला गलांडे, उमेश दिडवळ, विकास वाघ, अर्जुन शिरसट, प्रशांत ढवळे, किरण लंगोटे, राणीताई लंगोटे, अर्जुन मिंढे, शरद जगदाळे, रोहिणी जगदाळे, दत्ता जाधव, सोनाली कदम, सुनील एकाड, आणि कोंचीकोरवे समाजाचे श्री. सुरेश तात्या पवार.

या व्रताची समाप्ती रविवार, १० नोव्हेंबर रोजी वर्धमान श्वेतांबरवाशी जैन स्थानक, भिगवण येथे पारण्याने झाली. या पारण्याचे नियोजन गेली वीस वर्षे नियमित उपवास करणाऱ्या ८२ वर्षीय श्रीमती पद्माबाई गौतमचंद रायसोनी यांच्या दानातून करण्यात आले.

जैन धर्मियांच्या चातुर्मास यज्ञात मराठा महासंघाची आहुती...! जैन धर्मियांच्या चातुर्मास यज्ञात मराठा महासंघाची आहुती...! Reviewed by ANN news network on ११/१२/२०२४ ०९:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".