पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आकुर्डी गावठाण व परिसरात आयोजित पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली पदयात्रा विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले तर युवक-युवतींनी पुष्पवृष्टी करून बनसोडे यांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष व माजी नगरसेविका वैशाली काळभोर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, भाजपा शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, ईश्वर ठोंबरे, निलेश पांढरकर, प्रमोद कुटे, कैलास कुटे, सविता वायकर व तेजस्विनी दुर्गे, मनीष काळभोर, सतीश काळभोर, कामगार नेते रवी घोडेकर, आबा गायकवाड, रेखा कडाली, मनीषा शिंदे, नाना पिसाळ, खेमराज काळे, अजय शितोळे, सतीश लांडगे, आकुर्डी जेष्ठ नागरिक संघाचे आबा गायकवाड, महेश काटे, मंगेश कुटे, सचिन काळभोर, सचिन बंदी, संतोष तरटे, वसंत काळभोर, मनीषा शिंदे, चैतन्य काळभोर आदींचं आकुर्डी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख पदाधिकारी युवक युती व महिला भगिनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.
पदयात्रेदरम्यान बनसोडे यांनी जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आकुर्डी जेष्ठ नागरिक संघासह स्थानिक युवक-युवती आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०५:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: