सांगलीमध्ये महायुतीला विजयी करा : अमित शाह

 

सांगली : महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगली येथे केले. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारसभेत शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या सभेला कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाविकास आघाडीवर तुष्टीकरणाचा आरोप

श्री. शाह म्हणाले की, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला तुष्टीकरणाचे राजकारण करून जातीयता पसरवून देशाला कमकुवत बनवायचे आहे. मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर विरोधी नेत्यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र, मोदींच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये कोणतीही हिंसक घटना घडली नाही, असे सांगत त्यांनी मोदींच्या धाडसाचे कौतुक केले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात देशात वारंवार बॉम्बस्फोट झाले; परंतु मोदी सरकारने उरी, पुलवामा हल्ल्याला पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिले.

संविधानाचा मुद्दा आणि राहुल गांधी यांच्यावर टीका

राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये संविधान म्हणून कोऱ्या पानांचे पुस्तक दाखवून संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचे सांगून शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मोदी सरकार संविधान आणि आरक्षणाचे रक्षण करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

सांगलीच्या विकासासाठी आश्वासन

सांगली परिसराच्या विकासासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगत, पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याचेही श्री. शाह यांनी नमूद केले. शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाकरे आणि वक्फ कायदा सुधारणा

श्री. शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत, सत्ता मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केल्याचे आरोप केले. मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणारच, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शाह यांनी सांगलीवासीयांना येथील विमानतळ, राष्ट्रीय हळद मंडळ, तसेच हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदतीचे आश्वासन दिले.

सांगलीमध्ये महायुतीला विजयी करा : अमित शाह सांगलीमध्ये महायुतीला विजयी करा :  अमित शाह Reviewed by ANN news network on ११/०८/२०२४ १०:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".