सखाराम बाईंडरचे विडंबन नाट्य 'मॅड सखाराम'ला रसिकांचा उदंड प्रतिसाद
पिंपरी - पिंपरी - मराठी साहित्य क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाची सांगता त्यांच्या 'सखाराम बाईंडर' या नाटकावर आधारित विडंबन नाट्य 'मॅड सखाराम'च्या सादरीकरणाने रंगली. मंगेश सातपुते दिग्दर्शित या नाटकात सखारामाच्या भूमिकेत सुनील जाधव यांनी आपल्या अभिनयाने मानवी स्वभावाचे विविध कंगोरे प्रभावीपणे साकारले आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. नाटकात श्रेयस वैद्य, विशाल मोरे, अलका परब, किरण राजपूत, प्राजक्ता पवार यांनी देखील आपापल्या भूमिका सशक्तपणे सादर केल्या.
यानंतर "अनुभूती" या कार्यक्रमात नुपूर नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी विविध नृत्यप्रकार सादर केले. गुरु डॉ. सुमेधा गाडेकर यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली, आणि त्यानंतर झपताल, कवित, द्रौपदी सारख्या विविध प्रस्तुत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. "महाराष्ट्राची संत परंपरा" या नृत्य नाटिकेला विशेष प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाच्या अंतिम सत्रात "ब्लॅक अँड व्हाइट" या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात मालविका दीक्षित, अभिलाषा चेल्लम, चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर यांची गायन सादरीकरणे तर ऋतुजा इंगळे यांचे नृत्याविष्कार पाहायला मिळाले. "अपलम चपलम", "मधुबन में राधिका नाचे रे", "अपना दिल तो आवारा" या सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांना पुरेपूर आनंद दिला.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजन प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी थिगळे, हंबीर आवटे, श्रेयश आवटे, गजानन चिंचवडे, सुरेखा कुलकर्णी, अस्मिता सावंत यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी यांनी केले, तर शरयू नगर प्रतिष्ठानचे सहकार्य या महोत्सवाला लाभले.
मॅड सखाराम'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाची सांगता
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:५९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: