सार्वजनिक वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज पिंपरी मेट्रो स्थानकावर प्रवाशांसोबत प्रवास करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी प्रवाशांनी वाहतूक कोंडी, तिकिटदर वाढ, अपंगांसाठी अपुऱ्या सुविधा आणि सार्वजनिक सुरक्षिततेसह अनेक समस्या मांडल्या.
मेट्रो स्थानकात प्रवाशांशी संवाद साधताना डॉ. शिलवंत यांनी उत्तम पायाभूत सुविधा, सुधारित सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षा उपायांवर भर देण्याचे आश्वासन दिले. अनेक प्रवाशांनी सध्याच्या स्थानिक आमदारांविषयी नाराजी व्यक्त केली.
"पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे आणि पार्किंगच्या अपुऱ्या सोयींमुळे नागरिक खाजगी वाहतुकीकडे वळत आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे डॉ. शिलवंत म्हणाल्या.
त्यांनी प्रवाशांना परिवर्तनासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत शहराच्या विकासासाठी नवीन दृष्टिकोन मांडला.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: