वेलफेअर पार्टीचे कार्यकर्ते शिलवंत यांच्या प्रचारात सहभागी होणार
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) च्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने आज औपचारिक पाठिंबा जाहीर केला.
पक्षाचे पुणे जिल्हा सचिव सालार उमरसाहेब शेख यांनी डॉ. शिलवंत यांना पाठिंब्याचे लेखी पत्र सुपूर्द केले. या पाठिंब्यामुळे मतदारसंघातील मुस्लिम समाजाचे मतदान डॉ. शिलवंत यांच्या पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे शहरातील सर्व कार्यकर्ते डॉ. शिलवंत यांच्या प्रचार मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून विविध संघटना आणि पक्षांनी डॉ. शिलवंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचे मतदान लक्षणीय असल्याने, वेलफेअर पार्टीच्या पाठिंब्यामुळे डॉ. शिलवंत यांच्या विजयाचे गणित अधिक सोपे झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०३:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: