"आचारसंहिता भंगावर तत्काळ कारवाई; निवडणूक आयोगाची तयारी"
मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 'इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर' (ईएमएमसी) स्थापन केले आहे.
२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानादिनी आणि त्याच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रत्येक बातमीचे सूक्ष्म निरीक्षण केले जाणार आहे. आचारसंहिता भंग, कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित बातम्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
मुंबईत राज्यस्तरीय आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कोणत्याही दखलपात्र घटनेची संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ दखल घेतली जाईल.
या संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत सहमुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड यांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक दयानंद कांबळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ १२:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: