"निगडी प्राधिकरणात बनसोडेंच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद"
पिंपरी (प्रतिनिधी): निगडी प्राधिकरणातील दुर्गादेवी टेकडीवर भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे महायुती उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.
प्रचार फेरीदरम्यान बोलताना बनसोडे यांनी या केंद्रात लिफ्टसह दोन मजली विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. निगडी प्राधिकरण परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
खासदार श्रीरंग बारणे यांनी बनसोडे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. गवळी समाजाच्या महिलांनी त्यांचा विशेष सत्कार केला. प्रचार फेरीत आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आमदार उमा खापरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.
टिळक चौक ते साई बाबा मंदिरपर्यंत विविध मार्गांवरून प्रचार फेरी काढण्यात आली. नागरिकांनी महायुतीच्या कामांबद्दल समाधान व्यक्त करत भक्कम पाठिंबा दर्शवला. बनसोडे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले आणि महिलांकडून औक्षण स्वीकारले.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ १२:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: