दोन हजार ५५४ झोपड्यांचे होणार पुनर्वसन
पुणे : गुलटेकडी परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहत इंदिरानगरमधील महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचे एसआरए अंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन होणार असल्याची माहिती भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
"महाविकास आघाडीच्या काळात खंडित झालेली एसआरए नियमावली महायुती सरकारच्या काळात मंजूर करून घेतली. महापालिकेच्या जागांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन महापालिकेनेच करावे ही मागणी मान्य झाली," असे त्या म्हणाल्या.
गुलटेकडीतील १२ एकर जागेवरील मीनाताई ठाकरे इंदिरानगर वसाहतीत २,५५४ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यांचे पुनर्वसन होणार आहे.
सुधारित नियमावलीनुसार ७० ऐवजी ५० टक्के झोपडीधारकांची मान्यता आणि पाच किलोमीटर परिसरातील दोन झोपडपट्ट्यांचे एकत्रित पुनर्वसन करण्याची मुभा मिळाल्याने पुनर्वसन प्रकल्पांना गती मिळाली आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: