पाणी तक्रारींसाठी पुणे महापालिकेचा ई-मेल आयडी जाहीर
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा समस्येसंदर्भात दाखल जनहित याचिकेनंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या तक्रारींसाठी पुणे महापालिकेने विशेष ई-मेल आयडी जाहीर केला आहे.
वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर १० एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.
या समितीमध्ये दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांचा समावेश आहे.
नागरिकांनी पाणीप्रश्नाबाबत तक्रारी waterpil126@punecorporation.org या ई-मेल आयडीवर नोंदवाव्यात, असे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी कळवले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०५:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: