सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना; फडणवीसांचे आश्वासन

 


उमरेड मतदारसंघात फडणवीसांची विकासाची ग्वाही

उमरेड, नागपूर (प्रतिनिधी): महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवली जाणार असून, धान उत्पादकांना २५ हजार रुपयांचा बोनस दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजपा-महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचारसभेत बोलताना फडणवीस यांनी तरुणांसाठी १५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, शेतकऱ्यांसाठी कृषी पंप वीज बिल माफी आणि सौर पंप योजनांची घोषणा केली. नमो किसान योजनेंतर्गत मिळणारी १२ हजार रुपयांची रक्कम वाढवून १५ हजार रुपये करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

विदर्भाच्या विकासासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, तारणा तलाव आणि कोलासुर टेकडीचा जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेला आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, माजी आमदार राजू पारवे, आनंदराव राऊत, दिलीप सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना; फडणवीसांचे आश्वासन सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना; फडणवीसांचे आश्वासन Reviewed by ANN news network on ११/११/२०२४ ०८:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".