मुंबई: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी **५८.२२ टक्के मतदान** झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यभरात निवडणूक शांततेत पार पडली असून मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जिल्हानिहाय मतदानाचा तपशील
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे:
अहमदनगर: ६१.९५%
अकोला: ५६.१६%
अमरावती:५८.४८%
औरंगाबाद: ६०.८३%
बीड: ६०.६२%
भंडारा: ६५.८८%
बुलढाणा: ६२.८४%
चंद्रपूर: ६४.४८%
धुळे ५९.७५%
गडचिरोली: ६९.६३%
गोंदिया: ६५.०९%
हिंगोली: ६१.१८%
जळगाव: ५४.६९%
जालना: ६४.१७%
कोल्हापूर: ६७.९७%
लातूर: ६१.४३%
मुंबई शहर: ४९.०७%
मुंबई उपनगर: ५१.७६%
नागपूर: ५६.०६%
नांदेड: ५५.८८%
नंदुरबार: ६३.७२%
नाशिक: ५९.८५%
उस्मानाबाद: ५८.५९%
पालघर: ५९.३१%
परभणी: ६२.७३%
पुणे: ५४.०९%
रायगड: ६१.०१%
रत्नागिरी: ६०.३५%
सांगली: ६३.२८%
सातारा: ६४.१६%
सिंधुदुर्ग: ६२.०६%
सोलापूर:५७.०९%
ठाणे: ४९.७६%
वर्धा: ६३.५०%
वाशिम: ५७.४२%
यवतमाळ: ६१.२२%
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान
गडचिरोली जिल्ह्यात ६९.६३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे, तर मुंबई शहरात सर्वात कमी म्हणजे ४९.०७ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये मतदानाची टक्केवारी अधिक दिसून आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: