दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १० आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२४, सिझन ६ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत आले आहेत.
ही सायकल स्पर्धा १ ते ६५ किमी अंतराची असून १० नोव्हेंबर रोजी लांब अंतराच्या ३०, ४५ व ६५ किमी हॉर्नबिल सिनिक रुट मार्गावर होईल. ६५ किमी सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते चंडिका देवी दाभोळ ते पंचनदी, गोमराई, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, आसुद, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. ही स्पर्धा सकाळी पाच वाजता सुरु होईल. स्पर्धकांना ६ तासात १००० मीटर चढ उतार असणारे ६५ किमीचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता दापोली शहरातील ४ किमीची शॉर्ट सिटी लूप राईड आणि विनामूल्य फन राईड असेल. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय काही खास बक्षिसे पण असतील. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल.
यासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी फॉर्म विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ या ठिकाणी मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९०२८७४१५९५ हे आहेत. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सायकल चालवत यामध्ये सहभागी व्हा आणि तंदुरुस्त जीवनशैली अनुभवा असे आवाहन दापोली सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०३:४०:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: