पुणे : पुणे शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा उद्या शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता स्थळ शहीद तुकाराम ओंबाळे मैदान, गोखले नगर येथे आयोजित केली आहे.
त्याआधी मुख्यमंत्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील पुतळ्याला हार अर्पण करतील. त्यानंतर फर्ग्युसन रोडवर रोड शो करणार आहेत.
या रोड शो व सभेसाठी महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
या रोडशो आणि सभेद्वारे महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शंखनात घुमणार असून महायुतीचे सर्व उमेदवार निर्विवाद यश संपादन करतील असा विश्वास शिवसेना नेते किरण साळी यांनी व्यक्त केला आहे.
पुणे शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:२६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०८:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: