"उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक कटिबद्ध"
पिंपरी (प्रतिनिधी) -"यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्याची लढाई असून, सर्वसामान्यांचे हक्क हिरावणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक पेटून उठला आहे," असे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मावळ लोकसभा संघटक संज्योग वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्राणपणाने काम करत असून, आघाडी प्रचंड बहुमताने सत्तेत येईल आणि त्यानंतर महापालिकाही काबीज करू, असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला.
मेळाव्यास मावळ लोकसभा संघटक संज्योग वाघेरे, पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमूख केशरीनाथ पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, युवासेना प्रमुख चेतन पवार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर संघटिका अनिता तुतारे, वैशाली मराठे, तुषार नवले, अनंता कोऱ्हाळे, अमोल निकम, संतोष पवार, संतोष सौंदणकर, वैशाली कुलथे, कुदरत खान, युवराज दाखले, संदीप भालके यांच्यासह विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
"इडा पिडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे" या म्हणीप्रमाणे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणू, असे चेतन पवार यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०७:५०:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: