"राज्यभरातून शेकडो ज्योतिष अभ्यासकांचा सहभाग"
पुणे (प्रतिनिधी): गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या वतीने आयोजित वास्तू ज्योतिष संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हॉटेल प्रेसिडेंट येथे १५ व १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या संमेलनात कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत आणि वास्तूशास्त्र या विषयांवर सखोल चर्चा झाली.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन ज्योतिष तज्ज्ञ दीपक गुप्ता यांच्या हस्ते झाले. दत्तप्रसाद चव्हाण अध्यक्षस्थानी होते. प्रसिद्ध ज्योतिषी आदिनाथ साळवी, पं. राज कुंवर, चंद्रकांत शेवाळे आणि नवीन कुमार शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
संमेलनात भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, स्मार्ट ऍस्ट्रॉलॉजर्स, ज्योतिष प्रबोधिनी, वास्तू ज्योतिष मित्र, आयादी ज्योतिष आणि वास्तू संस्था, मराठी ज्योतिषी मंडळ या संस्थांनी सहभाग नोंदवला. दिवसभर झालेल्या सत्रांमध्ये विनायक आगटे, विकास वैद्य, विजयानंद पाटील, सौ. अनुराधा कोगेकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार डॉ. सौ. जयश्री बेलसरे यांना प्रदान करण्यात आला. गौरीकैलास ज्योतिष संस्थेचे संस्थापक कैलास केंजळे आणि सौ. गौरी केंजळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या संमेलनाचे हे तिसरे वर्ष असून, प्रश्नोत्तरे आणि विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ११:३६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: