नवनाथ जगताप यांचा महाविकास आघाडीत प्रवेश
वाकड - चिंचवडमधील जगताप पॅटर्न यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदार हद्दपार करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते.
पवार यांनी युती सरकारवर टीकास्त्र सोडताना चिंचवडमध्ये काहींनी केवळ नातेवाईक आणि भाच्यांना वाढवण्याचेच काम केल्याचा गंभीर आरोप केला. ब्लू लाईनच्या माध्यमातून मतदारांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राहुल कलाटे यांनी भाषण करताना सांगितले की, मागील वीस वर्षांत परिसरातील मूलभूत समस्या कायम आहेत. आयटी पार्कमधील सुविधांच्या अभावामुळे कंपन्यांचे स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली.
महत्त्वाची घटना म्हणजे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीत प्रवेश केला. यामुळे प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी महापालिकेच्या आठ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाची विभागणी दोन आमदारांनी केल्याचा आरोप केला. पाणी टंचाई आणि टँकर माफियांच्या वर्चस्वाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, विशाल वाकडकर, इम्रान शेख, युवासेना प्रमुख चेतन पवार, ज्योती निंबाळकर, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, रविराज काळे, सागर तापकिर, कौस्तुभ नवले, सागर चिंचवडे, स्वप्निल बनसोडे , अनिता तुतारे, वैशाली मराठे, सागर चिंचवडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०४:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: