बालदी यांनी माफी मागावी" - आगरी समाजाची मागणी
उरण (प्रतिनिधी): भाजपचे उरण विधानसभा उमेदवार महेश रतनलाल बालदी यांनी आगरी समाजाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यांच्या निषेधार्थ १२ नोव्हेंबर रोजी उरण पोलीस स्टेशनवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालदी यांनी २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आयोजित सभेत आगरी समाजाबद्दल हेटाळणीयुक्त शब्दप्रयोग केले. विशेषतः नवी मुंबई विमानतळाचा "अदानी विमानतळ" असा उल्लेख करून लोकनेते दि.बा. पाटील यांचाही अपमान केला.
अखिल आगरी समाज परिषदेने १ नोव्हेंबर रोजी बालदी यांना निषेधपत्र पाठवून जाहीर माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. यापूर्वीही मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आगरी समाजातील महिलांबद्दल अनुचित टिप्पणी केली होती.
मोर्चा सकाळी ११ वाजता कोटनाका येथील उरण शहर प्रवेशद्वारापासून निघणार असून, पाटील यांनी सर्वांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०४:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: