आई मातोश्री ग्रुप"ला गडकिल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक
उरण (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि रांगोळी कलेची जोपासना या उद्देशाने युवा संघटना सोनारीने आयोजित केलेल्या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
श्री सिद्धिविनायक मंदिर, सोनारी येथे आयोजित गडकिल्ले स्पर्धेत 'आई मातोश्री ग्रुप सोनारी'ने प्रथम क्रमांक पटकावला. लव्या, कृपा आणि मनन म्हात्रे यांना द्वितीय, तर जय शिवराय ग्रुप सोनारीला तृतीय क्रमांक मिळाला. रांगोळी स्पर्धेत काशिश कडू (प्रथम), स्मिता भोईर (द्वितीय) आणि वांशिका तांडेल (तृतीय) यांनी बाजी मारली.
सत्या कडू, राकेश नरेश कडू, दिपक चिंतामण कडू यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. युवा संघटनेच्या या पहिल्याच उपक्रमाद्वारे गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.
राकेश कडू मित्र परिवार आणि युवा संघटना सोनारीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०४:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: