भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार पदयात्रेला बुधवारी चिखली परिसरात मोठा जनसमुदाय उपस्थित होता. टाळगाव चिखली कमानीपासून सुरू झालेल्या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले.
गव्हाणे यांनी सर्वप्रथम गणेश मंदिरात दर्शन घेतले. पदयात्रेदरम्यान ज्येष्ठ महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
पदयात्रा गणपती मंदिरापासून श्री राजे सोसायटी, महादेव नगर, गणेश कॉलनी, सुखकर्ता कॉलनी, दुर्गानगर, रामदासनगर, पाटील नगर, भांगरे कॉलनी या मार्गाने गेली. मार्गात अजित गव्हाणे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
या पदयात्रेत माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, माजी सरपंच काळूराम यादव यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले.
गव्हाणे यांनी चिखली परिसरात 'स्मॉल क्लस्टर' उभारण्याचे आश्वासन दिले. तसेच पाणी पुरवठा, रस्ते आणि वीज या मूलभूत सुविधा सुधारण्याचे आश्वासनही दिले.
"महाविकास आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून विजय निश्चित असल्याचे दिसत आहे," असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला.
पदयात्रेदरम्यान "घुमू दे तुतारी... पवार साहेबांची तुतारी" या प्रचारगीताने वातावरण दुमदुमून गेले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: