पिंपरी : पिंपरी मतदार संघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवारी दापोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
जाहीरनामा प्रकाशनानंतर आ. बनसोडे यांच्या प्रचारार्थ फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. प्रचार फेरीत सिद्धार्थ नगर, नरवीर तानाजी पुतळा, पवार वस्ती, एसएमएस कॉलनी, आतार वीटभट्टी, महाविहार, काचीवाडा, फुलेनगर यासह विविध भागांचा समावेश होता.
या प्रचार फेरीत आरपीआय आठवले गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजपचे नेते सदाशिव खाडे, आमदार उमा खापरे यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले.
जाहीरनाम्यात प्रमुख आश्वासने:
- संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे
- झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन
- पाणी नियोजन
- वल्लभनगर एसटी स्टँडचा पुनर्विकास
- शिवाजी महाराज थीम पार्क
- जागतिक दर्जाचे मत्स्यालय
- पाच रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण
- माता रमाई स्मारक व अण्णाभाऊ साठे स्मारक उभारणी
- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक
प्रचार फेरीत महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: