मुंबई (प्रतिनिधी): राज्यात उद्यापासून रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेष म्हणजे ही घट टप्प्याटप्प्याने होणार असून, येत्या 20-21 नोव्हेंबरपर्यंत तिचा प्रभाव जाणवेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत चालू हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे तापमान थंडीच्या लाटेच्या सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक राहील, अशी माहिती हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः 18 व 19 नोव्हेंबरनंतर हलक्या ऊबदार कपड्यांची गरज भासू शकते. वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
नोव्हेंबरच्या मध्यास थंडीचा कडाका; तापमान घटणार
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ०९:२९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ०९:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: