सुशिक्षित प्रतिनिधीची निवड महत्त्वाची - ईशदर्शनाजी महाराज
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात जैन समाजाच्या समस्या समजून घेणारा उच्चविद्याविभूषित लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक असल्याचे मत प्रख्यात जैन साध्वी ईशदर्शनाजी महाराज यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी चिंचवड परिसरातील प्रचारादरम्यान श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व कल्याण प्रतिष्ठान येथील चातुर्मासात उपस्थित जैन साध्वींचे दर्शन घेतले.
या वेळी ईशदर्शनाजी महाराज यांनी डॉ. शिलवंत यांच्याशी संवाद साधताना सभागृहात सुशिक्षित व्यक्तीची निवड महत्त्वाची असल्याचे सांगितले. सुशिक्षित प्रतिनिधी लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
चातुर्मासानिमित्त उपस्थित असलेल्या प्रमोदसुधाजी महाराज यांच्या गुरु भगिनी डॉ. प्रियदर्शनाजी महाराज, डॉ. प्रणवदर्शनाजी महाराज आणि ईशदर्शनाजी महाराज या तिन्ही साध्वींनी डॉ. शिलवंत यांना विजयाचे आशीर्वाद दिले.
या परिसरात जैन समाजाची मोठी लोकसंख्या असून उच्चविद्याविभूषित प्रतिनिधी निवडून आल्यास त्याचा समाजाला मोठा फायदा होईल, असा विश्वासही साध्वींनी व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०५:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: