"भोसरीत राष्ट्रवादीत मोठी 'इनकमिंग'; अनेक नेत्यांचा प्रवेश"
भोसरी : "महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या. महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भोसरीतील सभेत दिली.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ गाव जत्रा मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.
"एकेकाळी देशात अग्रगण्य असलेला महाराष्ट्र आज भाजपच्या आठ वर्षांच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे," असा टोला त्यांनी लगावला.
महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत पवार म्हणाले, "एका बाजूला 'माझी लाडकी बहीण' योजना राबवली जात असताना दुसरीकडे राज्यात 886 मुली बेपत्ता आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये प्रत्येक बेरोजगार तरुणाला चार हजार रुपये अनुदान दिले जाईल."
सभेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, माजी नगरसेविका सारिका लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.
या वेळी शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१४/२०२४ ०२:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: