पुणे : दसरा-दिवाळी कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभाग व जिल्ह्यात धडक मोहीम राबवून २४ लाख ७ हजार ९१८ रुपयांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.
पुणे जिल्ह्यात ४८ आस्थापनांमधून ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तूप, बटर, खवा, वनस्पती व भगर यांचा १४.८८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
पुणे विभागात ८३ आस्थापनांच्या तपासणीत १०२ अन्न नमुने घेण्यात आले. भेसळयुक्त पदार्थांचा ९.१९ लाख रुपयांचा साठा जप्त केला.
भेसळीबाबत संशय असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले.
सणासुदीत अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा साठा जप्त"
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ १२:२८:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ १२:२८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: