पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेतर्फे "भव्य मतदार जनजागृती बाईक रॅली"चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता निगडी येथील भक्तीशक्ती चौकातून या रॅलीचा प्रारंभ होणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. "लोकशाहीचा जागर करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत मताधिकाराचा वापर करावा," असे आवाहन खोराटे यांनी केले.
सुमारे ३३ किलोमीटर अंतर पार करणारी ही रॅली तिन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख मार्गांवरून जाणार आहे. भक्तीशक्ती चौक ते मुकाई चौक, संत तुकाराम महाराज पूल, वाल्हेकरवाडी, डांगे चौक, थेरगाव, जगताप डेअरी, औंध-रावेत मार्ग, जुनी सांगवी, नाशिक फाटा फ्लायओव्हर मार्गे भोसरीपर्यंत रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात विविध माध्यमांतून मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०१:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: