पुण्यदशम बससेवा: तीन वर्षांत एक कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला

 


हेमंत रासने यांचा शनिवार आणि नारायण पेठेत प्रचार

पुणे (प्रतिनिधी) - शहराच्या मध्यवर्ती भागात दहा रुपयांत दिवसभर प्रवासाची सुविधा देणाऱ्या 'पुण्यदशम' बससेवेने तीन वर्षांत एक कोटीहून अधिक प्रवाशांचा टप्पा गाठल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुती उमेदवार हेमंत रासने यांनी केला.

शनिवार आणि नारायण पेठेतील प्रचार पदयात्रेदरम्यान बोलताना रासने म्हणाले, "स्थायी समिती अध्यक्षपदी असताना ५० मिडी बसेस खरेदीचा निर्णय घेतला. अरुंद रस्त्यांवर मध्यम आकाराच्या या बसेसमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध झाला."

सीएनजीवर चालणाऱ्या या पर्यावरणपूरक बसेसद्वारे कसबा मतदारसंघातील मध्यवर्ती पेठा, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि पूलगेट या वर्तुळाकार मार्गावर सेवा दिली जात आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीकडे प्रवाशांना वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे रासने यांनी सांगितले.

पुढील काळात आणखी ३०० मिडी बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून, पीएमपीएमएलची सेवा अधिक प्रवासीस्नेही करण्यासाठी नवीन उपक्रम राबविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यदशम बससेवा: तीन वर्षांत एक कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला पुण्यदशम बससेवा: तीन वर्षांत एक कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला Reviewed by ANN news network on ११/०५/२०२४ ०८:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".