भोसरी - राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुराधा राहुल फुगे हिची दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या 60 किलोग्रॅम वजन गटात तिने प्रथम क्रमांक पटकावला. याच स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. ऋतुजा मार्के हिने 48 किलोग्रॅम गटात द्वितीय, तर ओम जाधव याने 56 किलोग्रॅम गटात तृतीय क्रमांक मिळवला.
खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. अजित गव्हाणे, सुधीर मुंगसे, विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, डॉ. नेहा बोरसे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०३:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: