भाजपाचे संकल्पपत्र जाहीर; 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य"
मुंबई - महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेऊन राज्याला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प भाजपाने केला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्पपत्र प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
शाह म्हणाले, "भाजपाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत. कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाक बंदी, सीएए आणि राम मंदिर उभारणी यासारखी वचने पूर्ण केली आहेत."
संकल्पपत्र समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, 877 गावांमधून 8,935 सूचना प्राप्त झाल्या असून, प्रत्येक मुद्द्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समिती नेमली जाईल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे संकल्पपत्र विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा रोडमॅप असल्याचे सांगितले.
शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटले की, सत्तेसाठी तुष्टीकरणाची विचारधारा स्वीकारली गेली आहे. त्यांनी धार्मिक आधारावर मतदानाच्या आवाहनाबाबत महाविकास आघाडीने स्पष्टीकरण द्यावे असे आव्हानही दिले.
कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०३:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: