उरण : भारतभर छटपूजा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांत या सणाचे महत्त्व मोठे आहे. या व्रतामध्ये स्त्रिया निर्जल उपवास धरतात आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करून (पूजन करून) उपवास सोडतात. सौभाग्य, समृद्धी आणि संतान प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. या सणादरम्यान सूर्यपुत्र यम आणि त्याची बहिण षष्ठी देवीचे पूजन केले जाते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला ही पूजा केली जाते.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात देखील छटपूजेला मोठा प्रतिसाद मिळाला. उरणमधील पिरवाड समुद्रकिनारी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छटपूजा साजरी केली. यावेळी बसंत पंचमी ट्रस्टचे संस्थापक रंजनकुमार यांनी माँ छटीची कृपा सर्वांवर राहू दे, सर्वांना सुख, समृद्धी, शांती आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सूर्याला अर्घ्य देऊन पूजा पार पडली, तर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी विधीवत पूजन करून छटपूजेस पूर्णविराम देण्यात आला.
या कार्यक्रमात बसंत पंचमी ट्रस्टचे चेअरमन दिनेश जैस्वाल, प्रेसिडेंट पी.टी. चव्हाण, व्हॉइस प्रेसिडेंट एस.एन. रॉय, जनरल सेक्रेटरी कामेश्वर शर्मा, ट्रेझरर मनोज कुमार शर्मा, सेक्रेटरी राम चौहान, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी दीपक कुमार मिश्रा आणि इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: